महाड ग्रामीण रूग्णालय येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दिव्यांगाची वैद्यकीय तपासणी करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप संपन्न
अलिबाग,दि.27 (जिमाका):- महाड ग्रामीण रूग्णालय येथे शुक्रवार, दि.24 जून 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 200 हून अधिक दिव्यांगाची वैद्यकीय तपासणी करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या शिबिरामध्ये महाड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद, गटविकास अधिकारी श्री.पोळ, रूग्ण कल्याण समितीचे सिध्देश पाटेकर, महाड उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.जगताप, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या प्रहार संघटनेचे महाड-पोलादपूरचे अध्यक्ष फैज हुर्जूक उपस्थित होते.
महाड प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व इतर मान्यावरांच्या हस्ते दीपप्रज्वलननाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते काही दिव्यांग बांधवाना प्रमाणपत्र देण्यात आले. दिवसभरात 240 अर्जांची ऑनलाईन नोंदणी व 160 अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी डॉ.जगताप, डॉ.अडकलमोल, अलिबाग जिल्हा रुग्णालय व महाड ग्रामीण रूग्णालयाच्या सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रहार संस्थेचे तालुका अध्यक्ष फैज हुर्जूक, तालुका महिला उपाध्यक्ष आरती साळुंके, तालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे, शहर अध्यक्ष मोहसिन दरेखान, उपाध्यक्ष विजय मोरे, शहर सचिव सनिल जंगम, अध्यक्ष धनंजय शिंदे, शहर महिला अघाडी अध्यक्षा सबरिन इसाने यांचे सहकार्य लाभले. प्रहार संस्थेमार्फत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, डॉ.जगताप, डॉ.अडकमोल व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
जुलै महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी अस्थिव्यंग व अल्प दृष्टी असलेल्या रूग्णांची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी मतिमंद व्यक्तींसाठी कॅम्प घेण्यात येईल, याचा महाड-पोलादपूर तालुक्यातील सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.