स्केटबोर्डिंगची स्पर्धा पनवेल मध्ये पहिल्यांदा संपन्न

 स्केटबोर्डिंगची स्पर्धा पनवेल मध्ये पहिल्यांदा संपन्न 


पनवेल दि. ११ (संजय कदम): स्केटबोर्डिंगची स्पर्धा पनवेल मध्ये प्रथमच संपन्न झाली असून या स्पर्धेला तरुणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

        या स्पर्धेला स्केटबोर्डिंग हा खेळ १९५० मधे कॅलिफोर्निया येथे सुरु झाला पण त्यानंतर काही काळ कमी झालेली प्रसिद्धी 1975 मध्ये पुन्हा वाढली आणि त्यानंतर तरुणांनी जगाच्या विविध भागात या खेळाला खूप प्रसिद्धी कमावून दिली. टोकियो २०२० ओलीम्पिकसमध्ये पहिल्यांदा ह्या खेळाची सुरुवात झाली. तसेच पनवेलमध्ये स्केटबोर्डिंग आपण सुरु केला पाहिजे हा विचार घेऊन अर्चिस आणि ओंकार दोन तरुणांनी ह्या खेळाला पनवेलमध्ये प्रसिद्धी देण्याचे योगदान त्यांनी दिले आहे.दोनापासून चार,चार पासून आठ तसे करता करता आज हा "स्केट वीथ मी" हा१००+ जणांचा संघ झालेला आहे. नुकतीच स्केटबोर्डिंगची स्पर्धा पहिल्यांदा पनवेल मध्ये पार पडली ज्यात ४० लहानमुलांनी भाग घेतला होता. यावेळी माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ  संपन्न झाला  या मध्ये 

वयोगट (३-७)

त्रितिय पारितोषिक - श्रेयांक चव्हाण  (३)

द्वितीय पारितोषिक - त्रिशा सोलंकी (७)

प्रथम पारितोषिक - दुनाया शाह (७)

वयोगट (८-१०)

त्रितिय पारितोषिक - साम्य लोहार (९)

द्वितीय पारितोषिक - औक्श पटणे (९)

प्रथम पारितोषिक - युवराज वावा(९)

वयोगट (११-१४)

त्रितिय पारितोषिक - शौर्य पटणे (१२)

द्वितीय पारितोषिक - मयंक तांबोळी  (१२)

प्रथम पारितोषिक - टेनिका शाह (१२)

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image