पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने जपली सामाजिक बांधिलकी:रा जी प शाळेतील मुलांना केले छत्र्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने जपली सामाजिक बांधिलकी:रा जी प शाळेतील मुलांना केले छत्र्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप


पनवेल (प्रतिनिधी)- पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने बुधवार दिनांक 15 जून रोजी पनवेल तालुक्यातील भोकरपाडा रायगड जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे आणि शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्‍यातील सक्रीय पत्रकारांची नोंदणीकृत संघटना असणाऱ्या मंचाने यापूर्वी देखील सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

       पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्यांचे आणि छत्री यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेचे सरचिटणीस मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले.

      मंचाच्या वतीने मुलांना छोट्या वह्या, मोठ्या वह्या, पेन,पेन्सिल, पट्टी असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.तसेच उत्तम प्रतीच्या छत्र्या देण्यात आल्या.यावेळी पनवेल तालुका पत्रकार मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, खजिनदार नितीन कोळी, विवेक पाटील, संजय कदम, अविनाश कोळी, राजू गाडे, भरतकुमार कांबळे,साजन फुलोरे, हनुमान फुलोरे, माजी उपसरपंच धनंजय पाटील, शाळेच्या शिक्षिका समृद्धी सुधीर पाटील,शिक्षक प्रकाश राजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image