पनवेल महानगरपालिकेवर आगामी निवडणुकीत भाजपचे निर्विवाद बहुमत- लोकनेते रामशेठ ठाकूर
कोविडमध्ये भाजपने केलेल्या कामाचा आदर्श घ्यावा- आमदार प्रशांत ठाकूर
कळंबोली (प्रतिनीधी)-भाजप हा एक-जीव होवून काम करणारा पक्ष आहे.पनवेल महानगर पालिकेच्या माध्यमातून भाजपच्या शिलेदारांनी केलेल्या विकासाच्या जोरावर आगामी निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत असून ७५- ८० नगरसेवक निवडून येतील असा आत्मविश्वास लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
नगरसेवक अमर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९ कोटी ३९ लाख रूपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते कळंबोली येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले महानगरपालिके शिवाय पनवेलचा विकास नाही ही दूरदृष्टी ठेवून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महनगरपालिका आणली. त्याला काहींनी विरोध केला. पण तो काही क्षणात मावळला. पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या मध्यामातून ९ लाखाचे काम करताना महिने- वर्ष लागत होते आता पालिकेच्या माध्यमातून ९ कोटींची कामे एकट्या कळंबोली मधून होताना आपण याच डोळ्याने पाहत आहोत. महाविकास आघाडी म्हणजे बिघाडी आहे. निवडणुकीच्या जागा वाटप होवू द्या म्हणजे कोणाची तोंडे कुणीकडे असतील ते पहायला मिळणार आहेत.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले अमर पाटील यांचा वाढदिवस हे निमित्त असून ते सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम करत आहेत.कोविडच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली त्याचा आदर्श घ्यावा, नुसते फोटोसाठी काम करू नये , आज अमर पाटील यांच्या वाढदवसानिमित्त ९ कोटींच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण होत आहे.अशी शेकडो कोटी कामे आपण महानगर पालिकेच्या माध्यमातून पाच वर्षात केली आहेत. कोविडच्या काळात अमर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चातून नागरिकांना लस देण्याचे मोलाचे काम केले. कोरोना महामारित लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा न करता गोरगरीब व गरजू एक लाख लोकांना अन्नाचे वाटप करण्यात आले. आपण सतत कामे करत आहात आणि ती सातत्याने चालू राहावी, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अमर पाटील यांच्याकडे कामाचे सातत्य असून त्यांनी कळंबोलीसाठी मोठी विकासाची कामे केली आहेत. त्यांनी केलेल्या कामाचे अभिनंदन करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी महापौर कविता चौतमोल यांनी अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर नगरसेवक बबन मुकादम, नगरसेवक राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, अरूण पाटील, रविशेठ पाटील, अशोक मोटे, , आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, यात महिलांची संख्या मोठी होती. तर जेष्ठ नागरिक आवर्जून उपस्थित होते.