रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मास्टरमाईंड लिग स्पर्धेमध्ये घवघवीत यश
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मास्टरमाईंड लिग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपदान केले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या २३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी ७३ विद्यार्थ्यांनी ए प्लस मिळवत दैदिप्यमान यश मिळविले असून, त्यांची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.