लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार


पनवेल(प्रतिनिधी) भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनी आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात गायिका गीता सुभाष म्हात्रे व सीमा प्रकाश पराड (बडेकर) यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा प्रमुख पाहुणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास कामगार नेते महेंद्र घरत, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, 1984च्या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पवार तसेच प्रीतम म्हात्रे, दर्शना भोईर आदी उपस्थित होते.
या वेळी ह. भ. प. एकनाथ आत्माराम पाटील (ज्येष्ठ सनदी लेखापाल व कीर्तनकार) ह. भ. प. विनायक महाराज कांबेकर (ज्येष्ठ कीर्तनकार), ह. भ.प. अरुणबुवा कारेकर (शिल्पकार व गायक), ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी (संगीत विषारद, भजन सेवा) यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘दिबां’चे सुपुत्र अतुल पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, सचिव बी. पी. म्हात्रे, सहसचिव विजय गायकर, सदस्य मेधा तांडेल, मनीषा तांडेल, मनस्वी पाटेकर यांच्यासह विद्याधर ठाकूर, पंढरीनाथ पाटील, खरे, विद्याधर पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास पत्रकार कटेकर, बाळकृष्ण म्हात्रे, व्ही. एन. ठाकूर, डी. बी.पाटील, काशिनाथ जाधव, तेजस पाटील, श्याम मोकल, श्री. ठाकूर, गणेश दाबणे, तुषार नाईक, अरुण म्हात्रे, राजू सावंत आदी मंडळीही हजर होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव विजय गायकर यांनी केले
Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image