कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेत पनवेलला तीन पारितोषिके; लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले अभिनंदन

कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेत पनवेलला तीन पारितोषिके; लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले अभिनंदन 


पनवेल(प्रतिनिधी) भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला. या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील तीन संस्थांच्या लघुपटांना पारितोषिक मिळाले आहे. या विजेत्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

        स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभरातून एकूण १३५ स्पर्धेकांनी स्पर्धेत सहभाग घेत, एक ते १२ मिनिटांचे लघुपट सादर केले होते. यापैकी काही निवडक लघुपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पाहून विशेष पसंती दर्शविली होती. या स्पर्धेत पनवेलमधील सत्यधर्म प्रोडक्शनच्या सेल्फी पॉइंट या लघुपटाला द्वितीय क्रमांक (५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह), अनन्या एजन्सीच्या सक्षम या लघुपटाला उत्तेजनार्थ क्रमांक (पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह) तसेच स्वर्णीम संस्थेच्या स्वच्छ सर्वेक्षण भारत या लघुपटाला उत्तेजनार्थ क्रमांक (पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह) प्राप्त झाले. या सर्व विजेत्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी  त्यांनी पारितोषिक प्राप्त संस्थांचे अभिनंदन केले. या वेळी कोकण विभाग संयोजक राहुल वैद्य, सहसंयोजक दिपक पवार, अक्षया चितळे, प्रदेश सदस्य सुनिल सिन्हा, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, जिल्हा सहसंयोजक गणेश जगताप, पनवेल शहर संयोजक निखिल गोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image