लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


 लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 



पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण येथील मोरु नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलजमधील दहावी आणि बारावीच्या परिक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.  त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुरुवारी सत्कार केला. 

            जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण येथील मोरु नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनीयर कॉलेज मधील दहावीच्या निकालामध्य प्रेम मुंबईकर यांने ८८.८० टके गुण प्राप्त करत प्रथम, ८७.६० टक्के मिळवत मृदुला पाटील हिने द्वितीय तर परी गुप्ता हिने ८७.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला बारावीच्या परिक्षेत राजकुमार म्हात्रे याने ७५.१७ टक्के गुण मिळवत प्रथम, केया ढवळे हीने ७३.५० टक्के मिळवत द्वितीय तर ७१ टक्के गुण प्राप्त करुन हर्ष ठाकूर याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांचा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सत्कार केला या वेळी मोरु नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलजचे चेअरमन भार्गव ठाकूर, मदन पाटील, मुख्याध्यापिका प्रणिता गोळे उपस्थित होत्या,

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image