सप्तसूत्री कार्यक्रम व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत खालापूर तालुक्यातील मौजे मिळ आदिवासी वाडी येथे शिबिर संपन्न

 

सप्तसूत्री कार्यक्रम व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत खालापूर तालुक्यातील मौजे मिळ आदिवासी वाडी येथे शिबिर संपन्न


     अलिबाग,दि.13 (जिमाका):-जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील खोपोली मंडळात, मौजे मिळ आदिवासी वाडी येथे “सप्तसूत्री कार्यक्रम व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत” सोमवार दि.13 जून 2022 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

     या शिबिरामध्ये महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग, महिला व बाल संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जातीचे प्रमाणपत्रे, शिधापत्रिकांचे अद्यावतीकरण, उत्पन्नाचे दाखले व येथील ग्रामस्थांना आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी बालविवाह रोखण्याकरिता ग्रामस्थांमध्ये जनजागृती व उपाययोजनांबाबतही माहिती देण्यात आली.

     या कार्यक्रमास महसूल विभाग, आदिवासी विभाग इत्यादी विभागातील अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image