कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी टाईम माऊझर पेण कंपनीतील कामगारांना ९,२५०/- रुपये पगारवाढ

 

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी

टाईम माऊझर पेण कंपनीतील कामगारांना ९,२५०/- रुपये पगारवाढ


उरण (प्रतिनिधी)-  कामगार नेते तथा रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे काम सातत्याने केले जाते. या वर्षातील सहावा पगारवाढीचा करार मे. टाईम माऊझर इंडस्ट्रीज पेण या कंपनीतील कामगारांसाठी करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ९,२५०/- रुपये चार वर्षासाठी पगारवाढ, देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगारांसाठी कंझ्युमर इंडेक्सनुसार वाढीव महागाई भत्ता सुरु करण्यात आला आहे ज्यामुळे कामगारांना पगारवाढी व्यतिरिक्त आर्थिक फायदा होणार आहे. तसेच एक लाख रुपयांची मेडीक्लेम पॉलिसी, ८.३३% बोनस अधिक ३,०००/- रुपये अनुदान, तात्काळ कर्ज ३०,०००/- रुपये, क्रिकेट सामन्यांसाठी दरवर्षी १०,०००/- रुपये, रजेमध्ये वाढ, पिकनिकसाठी प्रत्येकी १,०००/- रुपये, पावसाळी छत्री देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

                या करारनाम्याप्रसंगी न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. पि. के. रामण, सरचिटणीस श्री. वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे जनरल मॅनेजर श्री. चंद्रकांत भोपी, एच. आर. मॅनेजर               श्री. चेतन पिंगळे, कामगार प्रतिनिधी श्री. राजू पाटील, श्री. दिनेश पवार, श्री. किरण पाटील, श्री. प्रल्हाद ठाकूर, श्री. नरेश आंबेकर, श्री. वैभव शेळके तसेच संघटक श्री. शमीम अन्सारी, श्री. सुभाष यादव उपस्थित होते. संघटनेतर्फे केलेल्या भरघोस पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टाईम माऊझर मधील कामगार प्रतिनिधींनी संघटनेचे आभार मानले.

  

         

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image