‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेत पनवेलला तीन पारितोषिके

 ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेत पनवेलला तीन पारितोषिके


पनवेल(प्रतिनिधी) भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 26) कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला. या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील तीन संस्थांच्या लघुपटाला पारितोषिक मिळाले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्य व देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभरातून एकूण 135 स्पर्धेकांनी या स्पर्धेतून सहभाग घेत, एक ते बारा मिनिटाचे लघुपट सादर केले होते. यापैकी, काही निवडक लघुपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पाहून विशेष पसंती दर्शवली होती.
या स्पर्धेत पनवेलमधील सत्यधर्म प्रोडक्शनच्या सेल्फी पॉइंट या लघुपटाला द्वितीय क्रमांक 51000 रु. व स्मृतिचिन्ह, अनन्या एजन्सीच्या सक्षम या लघुपटाला उत्तेजनार्थ  5000 रु. व स्मृतिचिन्ह व स्वर्णीम संस्थेच्या स्वच्छ सर्वेक्षण भारत या लघुपटाला उत्तेजनार्थ 5000 रु. व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सर्व विजेत्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.
विजेत्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, प्रशांत दामले, मृणाल कुलकर्णी, आरोह वेलणकर, मानसी मागीकर, भाजप प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठचे अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, प्रभारी लक्ष्मण सावजी, पुणे महापौर मुरलीधर मोहोड, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, कोकण विभाग संयोजक राहुल वैद्य, सहसंयोजक दिपक पवार, अक्षया चितळे, प्रदेश सदस्य सुनिल सिन्हा, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, जिल्हा सहसंयोजक गणेश जगताप, पनवेल शहर संयोजक निखिल गोरे आदी उपस्थित होते.
Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image