पनवेल महापालिका क्षेत्रात सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडून मान्सूनपूर्व कामाची पाहणी

पनवेल महापालिका क्षेत्रात सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडून      मान्सूनपूर्व कामाची पाहणी



पनवेल (प्रतिनिधी)- पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्वची कामे युद्ध पातळी सुरु असून अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. त्यापार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सोमवारी कळंबोली परिसरामधील मान्सून पूर्वीच्या नाले सफाईच्या कामांची पाहणी करुन ज्या ठिकाणी अजूनही कामे सुरु आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पनवले महापालिका क्षेत्रातील कळंबोली सेक्टर १३, ८, १०, १ई, यांसह आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाळ्यापुर्वीची कामे वेगाने सुरु आहेत. या कामांची सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करुन ती कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याचे निर्देश दिले. या पाहणी वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ब च्या सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, सरचिटणीस दिलीप बिस्ट, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image