पनवेल मनसेमध्ये असंख्य युवकांचे पक्ष प्रवेश

 पनवेल  मनसेमध्ये असंख्य युवकांचे पक्ष प्रवेश


उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )

मनसे पक्ष प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी तळोजा मनसे कार्यालय पनवेल गड येथे विविध क्षेत्रातील  पक्षातील तरुणांनी महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. व पक्ष प्रवेश केला.तसेच संघटनात्मक मजबुती करण्याकरता असंख्य विभागातील विभाग अध्यक्ष व उपविभाग अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश भाई ठाकूर, उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश व पद नियुक्त्यांचा कार्यक्रम पार पडला.पनवेल तालुक्यामध्ये अतिशय उत्साहात आणि नवचैतन्य वातावरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात वाढतच आहे.आणि यापुढे देखील हजारो महिला भगिनींची पक्षप्रवेश प्रलंबित असून लवकरच होणाऱ्या  पुढील जाहीर मेळाव्यामध्ये प्रवेश घेवुन संपूर्ण पनवेल तालुका हा मनसेमय करणार असा निर्धार पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रामदास पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व नविन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मनसे जिल्हाध्यक्ष रामदास पाटिल यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांचे आंदोलने उभारून पक्षाची ताकद वाढवू असा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image