साई सितारा सोसायटी वासियांनी साजरा केला जागतिक पर्यावरण दिन

 साई सितारा सोसायटी वासियांनी साजरा केला जागतिक पर्यावरण दिन


पनवेल/ विजयकुमार जंगम 

साई सितारा सोसायटी वासीय हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत असतात. ह्याच सामाजिक उपक्रमाच्या भावनेतून  साई सितारा सोसायटी, सेक्टर ६, नवीन पनवेल वासियांनी जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. 

सुरुवातीला साई सितारा सोसायटी वासियांनी आपल्या परिसरात गुलमोहराची व औषधी वनस्पती आढूळसांची झाडे लावली. याप्रसंगी सोसायटीचे सचिव, अरविंद बोधनकर म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश हा समाजामध्ये जनजागृती व्हावी व जागतिक पर्यावरणाचे महत्व सर्वांना समजावे व आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो ह्या उद्देशाने आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत आहोत असे सांगितले. 

याप्रसंगी सोसाटीचे अध्यक्ष, अरविंद मोरे म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिन हा ५ जून १९७२ पासून सम्पूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो.  दरवर्षी १०० पेक्षा जास्त देश विश्वात ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. ह्याचा मुख्य उद्देश हा पृश्वीवरचे तापमान नियंत्रणात रहावे, प्रदुर्षण होऊ नये, पृथ्वीवर चांगले वातावरण राहावे, ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रणात राहावे व सर्वांना जागतिक पर्यावरणाची जनजागृती व्हावी. ते पुढे म्हणाले की, मानवाच्या जीवनात प्राणवायूचे महत्व फार आहे. मानव हा प्राणवायू शिवाय जगू शकत नाही. मुलं जन्मल्याबरोबर त्याला सर्वात प्रथम प्राणवायूची गरज असते. म्हणून मानवाच्या जीवनात झाडाला फार अनन्य साधारण महत्व आहे. आज साई सितारा वासियांनी झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला त्याचा आपल्या सर्व साई सितारा वासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात सुद्धा आपण असेच सामाजिक उपक्रम राबवू अशा अपेक्षा व्यक्त केल्या. 

याप्रसंगी सौ. आरती बोधनकर यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, झाडे लावणे हे मानवाच्या जीवनासाठी फार महत्वाचे आहे. झाडे मानवाला खूप काही देतात. त्याचे जतन करणे आपण सर्वांचे कर्तव्य आहे. आज महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला ही सुद्धा बाब चांगली आहे. ह्या पुढे सर्वानी लावल्या झाडांची निगा राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले. 

याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष, अरविंद मोरे, सचिव, अरविंद बोधनकर, अजित कुमार कुलकर्णी, दिव्या  निमजे, आरती बोधनकर, डॉ. नीलिमा मोरे, सुनीता  रास्ते, वर्षा तिवारी, अर्चना लगड, अंजली कुलकर्णी, सुजाता महाबळे, श्रेया चतुर्वेदी व आदित्य बोधनकर आदी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.