भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाईन निबंध स्पर्धा' आयोजित

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाईन निबंध स्पर्धा' आयोजित



पनवेल(प्रतिनिधी) कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष जून महिन्यातील शैक्षणिक वर्ष आता सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाईन निबंध स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. 
         इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हि स्पर्धा असून मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही पैकी कोणत्याही भाषेत सहभाग घेता येणार आहे. इयत्ता ८ वी ते १० वी या मोठ्या गटासाठी १ हजार ते १५०० तर इयत्ता ५ वी ते ७ वी या छोट्या गटासाठी ५०० ते ७०० शब्दांची मर्यादा असणार आहे. 'सुट्टीमध्ये मी घालवलेला अविस्मरणीय दिवस', 'ओढ शाळेच्या पहिल्या दिवसाची', 'हो! मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय' हे तीन विषय या स्पर्धेकरिता असून निबंध पाठविण्याची अंतिम तारीख २० जून २०२२ आहे. सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यात येणार असून विजेत्यांना भरघोस बक्षिसांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच निबंध ९९२०७६५७६५ या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image