नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठीच्या २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; गावोगावी बैठका

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठीच्या २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; गावोगावी बैठका 


पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात, यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिबांच्या स्मृतिदिनी म्हणजेच २४ जूनला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ झाला असून गुरुवारी न्हावे येथे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

        लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या करिता २४ जूनला आंदोलन  करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहेत. या बैठकीमध्ये भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांनी मार्गदर्शन करून आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, किशोर पाटील, सुधिर ठाकूर, सागरशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, सी. एल. ठाकूर, सदाशिव ठाकूर, तुकाराम मोकल, आनंता ठाकूर, रामदास ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मागील काही दिवसामध्ये खारघर येथील ओवेपेठ आणि वळवली येथेही ही जानजागृतीपर बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image