केशवस्मृती पतपेढीच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अविनाश कोळी यांचे पत्रकार मंचाकडून अभिनंदन

केशवस्मृती पतपेढीच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अविनाश कोळी यांचे पत्रकार मंचाकडून अभिनंदन 


पनवेल (प्रतिनिधी) येथील सुप्रसिद्ध अशा केशवस्मृती नागरी सहकारी पतपेढीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्ष अमित ओझे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सदस्य अविनाश कोळी यांची पतपेढीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

     संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने अविनाश कोळी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ, श्री साईबाबांची मूर्ती आणि पुस्तक भेट देऊन अविनाश कोळी यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंचाचे सरचिटणीस मंदार दोंदे, खजिनदार नितीन कोळी, पत्रकार विवेक मोरेश्वर पाटील, संजय कदम, भरत कुमार कांबळे, योगेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image