पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार समाधानकारक पावसाच्या आगमनापर्यंत 27 जून 2022 पासून सिडको अधिकारक्षेत्रात करण्यात येणार 25% पाणी कपात-नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे सिडकोचे आवाहन

पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार समाधानकारक पावसाच्या आगमनापर्यंत 27 जून 2022 पासून सिडको अधिकारक्षेत्रात करण्यात येणार 25% पाणी कपात-नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे सिडकोचे आवाहन


धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने, सिडको महामंडळातर्फे सिडको अधिकारक्षेत्रातील नोड आणि गावांतील नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाटबंधारे विभागाने सिडको महामंडळास सूचित केल्यानुसार उपलब्ध पाणी साठ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी 27 जून 2022 पासून सिडकोतर्फे 25% पाणी कपात करण्यात येणार आहे. 

      सिडकोतर्फे सिडको अधिकारक्षेत्रातील विविध नोड, गावे आणि हेटवणे पाणी पुरवठा योजना जलवाहिनी मार्गावरील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सिडकोचे हेटवणे धरण, नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, एमआयडीसीचे बारवी धरण आणि मजीप्राचे पाताळगंगा धरण या जलस्रोतांद्वारे सिडकोकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु उपरोक्त धरण क्षेत्रांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणी साठ्याचे काटेकोरपणे नियोजन करता यावे याकरिता सिडकोकडून 27 जून 2022 पासून 25% पाणी कपात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करत सिडकोला सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image