चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू


मुंबई, दि. 24- शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

     मार्च 2020 पासून कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिली ते 12 वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता. तसेच ही परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला पाठ्यक्रम 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी देखील कायम ठेवण्यात आला होता. 

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image