कार्यतत्पर शेकाप. नगरसेविका डॉ सुरेखा विलास मोहोकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने माणेक नगर सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला


कार्यतत्पर शेकाप. नगरसेविका डॉ सुरेखा विलास मोहोकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने माणेक नगर सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला


पनवेल (प्रतिनिधी)- प्र. क्र.१८मधील मानेक नगर सोसायटीला अपुरा पाणीपुरवठा होत होता.नगरसेविका डॉ. मोहोकार यांना याची तक्रार येताच सोसायटीचे सभासद  व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अविनाश पाटील यांच्यासमवेत पाहणी करून घेतली असता पाण्याचा पुरवठा करणारे पाइप व वाँल्हव नादुरुस्त आणि खराब होऊन फुटल्याचे  निर्दशनास आले. यावर ताबडतोब नव्याने पाइप टाकून देण्याचे काम सुरू करून घेण्यात आले. २३ मे ला हे काम पूर्ण करण्यात आले.याबद्दल सोसायटीच्या सदस्यांनी नगरसेविका डॉ  सुरेखा मोहोकर यांचे व पनवेल महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले. यासाठी मनेक नगर सोसायटीचे केतन शाह, वैशाली शाह,कोळी व  महिलावर्ग उपस्थित होता.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image