लयभारी साहित्य समूह सम्मेलनात कवयित्री सुनिता कपाळे यांचा सन्मान

लयभारी साहित्य समूह सम्मेलनात कवयित्री सुनिता कपाळे यांचा सन्मान


अलिबाग(सचिन पाटील)-सांगोला येथे २२ मे रोजी लयभारी साहित्य समूहाच्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय कवी  सम्मेलन पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर‌स्मृती भवनात पार पडला.

या कवी सम्मेलनात महाराष्ट्र राज्यातील असंख्य कवी,कवयित्री उपस्थित होते

या सम्मेलनात औरंगाबाद येथील कवयित्री सौ. सुनिता गोविंद कपाळे यांनी उत्कृष्ट काव्यसादीरकरण केल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे परशुराम कांबळे (विद्रोही कवि पी.के.),सम्मेलनाध्यक्ष गझलकार हेमंत रत्नपारखी, स्वागताध्यक्ष कवी विजय खाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

  औरंगाबाद येथील कवयित्री सुनिता गोविंद कपाळे या शीघ्र कवयित्री असुन त्यांना काव्यक्षेत्रात राज्यस्तरीय ते आंतरराष्ट्रिय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अष्टाक्षरी, षडाक्षरी,अभंग, गीत, लावणी इत्यादी प्रकारात लेखन करत असून उत्कृष्ट परिक्षण करणाऱ्या परिक्षक कवयित्री म्हणून सुनिता कपाळे यांची संपुर्ण महाराष्ट्रातील साहित्यक्षेत्रात ओळख आहे या सन्मानाबद्दल कवयित्री सुनिता कपाळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

या कार्यक्रमाचे आयोजन श्री.अनिल केंगार, श्री.गौसपाक मुलानी, पत्रकार खंडू भोसले, श्री.समाधान मोरे, श्री.संतोष रायबान, सौ.धनश्री वलेकर,श्री.कैलास शिरसागर, श्री.शिवाजी गेजगे, श्री.शिवाजी मोकाशी, टायगर ग्रुप सांगोला तालुका प्रमुख राणीताई चव्हाण, श्री.गजानन दराडे पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना, श्री.प्रमोद सूर्यवंशी, रंजना मांगले,श्री. बिरदेव कोळेकर,  श्री.अमीर पटेल, यांनी केले होते.

 तसेच  कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित सर्व कवी कवयित्री यांचे आभार गौसपाक मुलानी यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image