शालेय साहित्य व मंदिरासाठी ६२ लाख रुपये निधी आणि ४ गुंठे जागा देणाऱ्या छाजेड यांचा ग्रामस्थांनी केला सन्मान

शालेय साहित्य व मंदिरासाठी ६२ लाख रुपये निधी आणि ४ गुंठे जागा देणाऱ्या छाजेड यांचा ग्रामस्थांनी केला सन्मान 


नवीन पनवेल पळस्पे गावातील शाळा बांधणीसाठी २० लाख रुपयाचे साहित्य व हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ४२ लाख रुपये निधी तसेच चार गुंठे जागा मोफत देणाऱ्या अरिहंत बिल्डरचे संचालक अशोक छाजेड यांचा पळस्पे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. अ‍ॅड.संतोष  खांडेकर प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला. 

           यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सतीश पाटीलदर्शन ठाकूरसंदीप म्हात्रे, कुणाल लोंढेसुनील देवरेयोगेश निपाणीकिशोर साळुंखेनितीन त्रिमुखेअनिल पडवळ तसेच उद्योगपती अरिहंत बिल्डरचे मालक अशोक छाजेड, उद्योगपती इकबाल काझी आदी  उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले कीअरिहंत बिल्डरने पळस्पे गावासाठी केलेली मदत इतर व्यावसायिकांसाठी आदर्श ठरणार आहे. गावात येऊन व्यवसाय करताना गावाचे आपण काही देणे लागतो असे समजणे म्हणजे अशोक छाजेड यांचा मनाचा मोठेपणा आहे. इतर व्यवसायिकांनी देखील त्या त्या ठिकाणी आपली मदत गावासाठी करावी. असे ते म्हणाले तर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती करून संतोष खांडेकर यांनी समाजात एक मोलाची कामगिरी केली आहे. यावेळी अ‍ॅड. संतोष खांडेकर प्रतिष्ठान तर्फे अनेक मान्यवरांना सन्मान चिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये माजी सरपंच मोहन गवंडीदर्शना भोईर, सदस्य शालिनी ठाणगे, विजय कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील माजी स्वातंत्र सैनिक सुजित हातमोडेसचिन पाटीलरवींद्र चौधरी, डॉक्टर- प्रेरणा भगतहर्षदा पाटीलवकील-रुपाली कांबळेराकेश दिघेशशिकांत मुंढेसमाज कार्यकर्ते शारदा कांबळेराजेश कांबळे ,वायरमन संतोष कांबळेप्राध्यापकशिक्षक तसेच पळस्पे हनुमान प्रासादिक सोंगी भारुड मंडळी इत्यादींचा सन्मान करण्यात आला.

--

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image