बेलापुर ते पेंधर तळोजा मेट्रोचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी

बेलापुर ते पेंधर तळोजा मेट्रोचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी 


पनवेल दि.21 (संजय कदम) : बेलापुर ते पेंधर तळोजा मेट्रोचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी केली आहे. 

या निवेदनात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी म्हटले आहे की, बेलापुर पासून पेंघर तळोजा मेट्रो चे काम पूर्ण झालेले आहे असे सिडको महामंडळाकडे चौकशी केली असता सांगण्यात आले. तळोजा इंडस्ट्रियल मध्ये बाहेरून येणाऱ्या कामगारांची आणि नव्याने निर्माण झालेल्या तळोजा फेज 2 मध्ये खूप नागरी वस्ती निर्माण झाली आहे. तळोजा परिसरात खूप ट्रॅफिकचे प्रमाण वाढलेले आहे. सदर सर्व बाबी लक्षात घेऊन बेलापुर ते पेंधर तळोजा मेट्रोचे लोकार्पण करावे आणि नागरिकांना सहजपणे प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पनवेल, उरण व कर्जत विधानसभेतील सर्व आमदार, जिल्हा प्रमुख, व सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यांनी शिवसंपर्क अभियान टप्पा 2 चे सर्व क्षेत्रात मोठे बॅनर व सर्वत्र भगवे झेंडे लावून वातावरण भगवेमय करावे करण्याची विनंती रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी केली आहे. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image