शिवसेनेचे विभागप्रमुख मनेश पाटील यांचा वाढदिवस आदीवासी मुलांच्यासमवेत साजरा

शिवसेनेचे विभागप्रमुख मनेश पाटील यांचा वाढदिवस आदीवासी मुलांच्यासमवेत साजरा    


             

खारघर(प्रतिनिधी)-शिवसेनेचे खारघर प्रभाग क्रमांक ६ चे विभागप्रमुख मनेश पाटील यांचा वाढदिवस आदीवासी मुलांच्यासमवेत केक कापून आणि त्यांना खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला.खारघरपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या,गोल्फ कोर्सच्या पलीकडे,२१ व्या शतकातील शहराच्या जवळ पण;सोयीसुविधा आणि आधुनिक जगापासून कोसो दूर असणाऱ्या धामोळे गावातील २५ ते ३० आदीवासी मुलांसोबत केक कापून आणि त्यांना खाऊचे वाटप करून दरवर्षी मनेश पाटील आपला वाढदिवस साजरा करतात.विशेष म्हणजे मनेश पाटील यांची मुले तसेच त्यांच्या भावांची मुले सुद्धा या कार्यक्रमाला हजर असतात.जनसभाचे संपादक-आप्पासाहेब मगर यांनी आपल्या मनेश पाटील यांच्याशी संवाद साधला असता,त्यांनी सांगीतले की,मला या मुलानसोबत वाढदिवस साजरा करायला आवडतोच;पण माझी आणि माझ्या भावांची मुले सुद्धा धामोळे गावातील आदिवासी मुलांना भेटायला उत्सुक असतात.        

        मनेश पाटील हे तसे जन्मजात शिवसैनिक आहेत पण;त्यांच्या खिलाडू वृत्तीमुळे आणि केबल व्यवसायामुळे ते संपूर्ण पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहेत.त्यामुळे वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती सर्वपक्षिय मित्रानकडून,शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक, पदाधिकारी,परिसरातील नागरिक तसेच खास करून खारघरमधील युवा वर्गाकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image