एमपीएससीत ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात नेरे येथील सायली ठाकूर अव्वल

 एमपीएससीत ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात नेरे येथील सायली ठाकूर अव्वल


नवीन पनवेल : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या नेरे येथील सायली श्याम ठाकूर ने एमपी.एस.सी परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शासन सेवेत प्रथम वर्ग अधिकारी म्हणून तिची नियुक्ती करण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खडतर अभ्यासाचा डोंगर पार करून सायली ठाकूरने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर पनवेल मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       पनवेल मधील नेरे येथील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या सायली शाम ठाकूर ने उच्च माध्यमिक शिक्षण सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या के.आ.बांठिया विद्यालय मध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने खालापूर जवळील शांतिनिकेतन तंत्र विज्ञान महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवी प्राप्त केली. मात्र खाजगी कंपनी मध्ये सेवा करण्यापेक्षा प्रशासकीय सेवा करून जनसेवा करण्याची जिद्द उराशी बाळगल्याने तिने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. अभियंता चे शिक्षण पूर्ण करून सुद्धा शासकीय सेवेचा ध्यासाने तिने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सन २००० मध्ये घेतलेल्या परीक्षेतून राज्यातील ओबीसींच्या महिला प्रवर्गातून तिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून पनवेल सह राज्याचे नाव उंचावले आहे. 



--

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image