वारंवार जाणाऱ्या लाईट बाबत मनसे आक्रमक, थेट कार्यालयाबाहेर उन्हात ठिय्या

 वारंवार जाणाऱ्या लाईट बाबत मनसे आक्रमक, थेट कार्यालयाबाहेर उन्हात ठिय्या


नवीन पनवेल : महावितरणच्या खांदा कॉलनी कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्तेनी सतत जाणाऱ्या विजे बाबत जाब विचारला. दरम्यान येथे कुणीच अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी थेट कार्यालयाच्या बाहेर येऊन उन्हात जमिनीवर  बसून आंदोलन सुरू केले. यावेली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

     नवीन पनवेल, खांदा कॉलनी परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. ऐन उन्हाल्यात हा प्रकार वारंवार होत असल्याने नागरिकांचा जीव मेटकुटीला आला आहे. रहिवासी त्रस्त झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते खांदा कॉलनी कार्यालयात गेले होते. मात्र कोणताही अधिकारी येथे नसल्याने जोपर्यंत अधिकारी आम्हाला भेटत नाही तोपर्यंत दिवसभर आम्ही उन्हातच बसून राहणार अशी ताठर भूमिका यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.


--

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
दिनेश झिंगे व अन्य ९ जणांनी लावला २५ लाखांना चुना-अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
Image