अपघातग्रस्ताला मदत करा-शिरीष घरत

 अपघातग्रस्ताला मदत करा-शिरीष घरत


खारघर (प्रतिनिधी)- श्री. संतोष रामचंद्र ढवळे : राहणार सी- २३/ रुम. नं. १६, सेक्टर - १५, खारघर यांचा दिनांक : ३१ मार्च २०२२ रोजी वाशी ते खारघर प्रवासात अपघात झाला दुर्देवाने त्यांचा एक पाय काढण्यात आलेला आहे.व दुसऱ्या पायाची दुखापत फार मोठी आहे. सदर व्यक्ती डि वाय पाटील हॉस्पीटल नेरुल येथे अती दक्षता विभागात आहेत. मुलं लहान असुन घरात कमविणारे कोणीही नाही. दोन महिन्यात त्यांच्या पत्नीने अंगावरील दागीने विकुन औषधोपचार केले पण आता ते शक्य नाही. कृपया त्यांना आज आपल्या मदतीची गरज आहे.इच्छुकांनी कु. दिपाली संतोष ढवळे Account No. 99980106947349 | IFSC :FDRL0001757 Federal Bank (Airoli) Mobile No: 7710982743 अन्यथा या नंबर वर गुगल पे, फोन पे मदत करावी.(गावचा पत्ता : मु. किरुंडे, पो. वासोळे, ता. वाई, जि. सातारा.)शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्री. शिरीष घरत यांच्या हस्ते ढवळे कुटुंबीयांना मदत करण्यात आली.श्री. गुरुनाथ पाटील- शहर प्रमुख खारघर -५,००० रूपये आणि श्री. प्रकश गायकवाड - उपमहानगर प्रमुख-१५,००० रूपये अशी मदत देण्यात आली.अशी मदत करून आपणही माणुसकीचे दर्शन घडवावे असे आवाहन शिरीष घरत यांनी केले आहे.

संपर्क : 9967598666/8692069999

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image