ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांचा कोकण डायरी परिवार कडून विशेष सत्कार

ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांचा कोकण डायरी परिवार कडून विशेष सत्कार


पनवेल /प्रतिनिधी

       ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल या पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित केंद्रीय अध्यक्ष पदावर नियुक्त पनवेलचे जेष्ठ पत्रकार गणेश कोळी यांचा कोकण डायरी परिवार कडून विशेष सत्कार करण्यात आला.

   ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल संघटनेने पनवेलच्या सभेत गणेश कोळी यांना केंद्रीय अध्यक्ष पद दिले. गणेश कोळी गेली दोन तपाहून अधीक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.वाचकाला केंद्र मानून त्यांनी आजतागायत उत्तम पत्रकारिता केली आहे त्यांना केंद्रीय अध्यक्ष म्हणून मिळालेला मान हा पनवेलच्या सर्व पत्रकारांचा सन्मान वाढवणारा मान आहे असे कौतुकोदगार कोकण डायरीचे संपादक जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांनी मांडले.

 गणेश कोळी यांना पुणेरी पगडी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे अल्लाउद्दीन शेख,उरणचे अजीत पाटील, खारघरचे जसपाल सिंग नेओल, खोपोलीचे साबीर शेख,किरण बाथम, गणपत वारगडा,शंकर वायदंडे आदी पत्रकार मान्यवरांनी कोळीना शुभेच्छा दिल्या.

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र
Image