श्री सुभाष पुजारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक (आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू ) पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित
पनवेल (प्रतिनिधी)- सुभाष पुजारी है २००३ मध्ये कोल्हापूर येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले.सन एमपीएससीने घेतलेल्या स्पर्धापरीक्षा परीक्षा देउन २००९ मधे पोलिस उपनिरीक्षक झाले.ऑक्टोबर २०१० ते जुन २०११ नाशिक पोलीस अकादमी येथे पोलिस उपनिरीक्षक ट्रेनिंग पूर्ण केले.जुन २०११ ते मे २०१८ पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयांतील पनवेल तालुका पोलिस ठाणे,उरण पोलीस ठाणे,नेरुळ पोलिस ठाणे,पनवेल क्राइम क्राइम ब्रँच या ठिकाणी नोकरी केली आहे त्यामध्ये अनेक गुन्ह्यांची उकल त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे.अनेक सामाजिक कार्य सुद्धा त्यांनी केलेले आहे.त्यानंतर त्यांची बदली १ जुन २०१८ पासुन महामार्ग सुरक्षा पथक या ठिकाणी झाली.मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे याठिकाणी प्रभारी म्हणून नोकरी केली.महामार्गावर अपघात कमी करण्यासाठी विविध योजना त्यांनी राबविल्या व महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण कमी केले मृत्यूचा दर घटविण्यासाठी विशेष प्रयत्न केले पूर्ण कालावधीत अनेक गोरगरीब लोकांना मदत केली प्रवाशांना वाहन चालकांना मदत केली
अनेक आरोग्यविषयक शिबिरं घेतली वाहनचालकांचे प्रबोधन केले पत्रके वाटली.सुभाष पुजाऱी यांना त्यांनी पोलिस खात्यात आत्तापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल २६० बक्षिसे त्यांना मिळालेले आहेत.शरीरसौष्ठव खेळामध्ये त्यांनी २०२१ व २०२२ चा महाराष्ट्र श्री व भारत श्री किताब सलग दोनवेळा मिळविला.तसेच ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये त्याने ८० किलो गटामध्ये ब्रान्झ मेडल मिळवले आहे.
सध्या १५ जुलै रोजी मालदीव येथे होणार्या मिस्टर आशिया व नोव्हेंबरमध्ये होणार्या मिस्टर वर्ल्ड या शरीरसौष्ठवाची स्पध्रेची सध्या ते तयारी करत आहेत.त्यांना मिळालेल्या पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाबद्दल पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच सामाजिकव राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.