पनवेल तालुक्यातील तळोजामधील मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात..

पनवेल तालुक्यातील तळोजामधील मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.. 



तळोजा  : मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. दुपारच्या अजानवेळी तळोजा फेज वन याठिकाणी मशीदीसमोर हनुमान चालीसा लावण्यासाठी आलेले मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

      तळोजा फेज वन याठिकाणी मनसे कार्यकर्ते मशीदीसमोर हनुमान चालीसा लावण्यासाठी सज्ज झाले आणि त्याच वेळी तळोजा पोलिसांनी तालुका अध्यक्ष रामदास पाटील, उपतालुका अध्यक्ष कैलास माळी, उपतालुका अध्यक्ष सुरज गायकर, विभाग अध्यक्ष तळोजा योगेंद्र पाटील, क्रांतीलाल पाटील, राजेश पाटील, रोशन पाटील, करण पाटील, रोहित कोरडे मनसैनिकांना ताब्यात घेतले..

Popular posts
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिल्या ट्रॉमा सेंटरला सुरूवात
Image
मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न
Image
कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा!ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांचे प्रतिपादन
Image
शेकापचे राजेंद्र पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते ‘दिबां’चेच नाव मिळणार - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ठाम विश्वास
Image