जे.एम.म्हात्रे चॕरिटेबल संस्था,पनवेल या संस्थेने संस्थापित केलेल्या "भव्य मंदीर पंचायतनचा"प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

जे.एम.म्हात्रे चॕरिटेबल संस्था,पनवेल या संस्थेने संस्थापित केलेल्या "भव्य मंदीर पंचायतनचा"प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न



चौक/पनवेल(प्रतिनिधी)-काल शुक्रवार दिनांक १३ मे रोजी नढाळवाडी/चौक येथे,जे.एम.म्हात्रे चॕरिटेबल संस्था,पनवेल यांच्या "हिमांशु दिलीप पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल"जवळ याच संस्थेने  संस्थापित केलेल्या "भव्य मंदीर पंचायतनचा"प्राणप्रतिष्ठा सोहळा धार्मिक भावनेने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात अनेक दिग्गजांच्या व भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.                  

          या ठीकाणी श्री.मयुरेश्वर गणेश,संकटमोचन श्री.हनुमान,श्री.साईबाबा,श्री.भवानी माता आणि नढाळेश्वर महादेव या पाच मंदीरांचे "भव्य-दिव्य" असे संकुल उभारण्यात आले आहे.             हा संपूर्ण सोहळा वैशाख शुक्ल १० शके १९४४,बुधवार दिनांक ११ मे पासून १३ मे पर्यंत असा तीन दिवस चालला.या पाच भव्य मंदीरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा परमपूज्य सदगूरू बालयोगी सदानंदजी महाराज,तुंगारेश्वर,ह.भ.प.वेदांताचार्य डाॕ.नारायण महाराज जाधव,आळंदी,  महामंडलेश्वर प.पू.अनंत श्री विभुषित क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ आचार्य स्वामी ज्ञानचैतन्य पुरीजी महाराज, हरि महामंडलेश्वर स्वामी देवानंदजी महाराज, गंगामहल आश्रम, दशाश्वमेघ घाट, वाराणसी,ह.भ.प. श्री. महंत तुकोजी बुवा, पुजारी भवानी माता मंदिर, तुळजापूर,ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री, लेण्यादी, शिवनेरी (कार्याध्यक्ष : वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य)भागवताचार्य महाराष्ट्ररत्न ह.भ.प. आत्माराम शास्त्री महाराज, आळंदी यांच्या शुभहस्ते मंत्रोच्चारात,होम-हवनाने संपन्न झाला.भजन,किर्तन,हरिपाठ,सनई वादन,दिंडी अशा धार्मिक आणि वारकरी सांप्रदायाच्या वारशानुसार सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.हे तीन दीवस भाविकांना दीवसभर महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.                         

        हा परिसर निसर्गरम्य असून चारी बाजुने सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला आहे.येथे आल्यानंतर भाविकांना आत्मिक तसेच मानसिक शांतीची अनुभुती मीळते.महाराष्ट्रातील जनतेला याची माहिती मीळाल्यानंतर संपूर्ण राज्यातून भाविकांची येथे रांग लागेल.भविष्यात धार्मिक पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असे तिर्थस्थान म्हणून या स्थळाचा नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही,अशी भावना अनेक मान्यवरांनी,"जनसभाच्या दर्शकांना"आपली प्रतिक्रिया देताना संपादक-आप्पासाहेब मगर यांच्याजवळ व्यक्त केली.                     

       तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी महाष्ट्रातील नामांकीत उध्योजक श्री. जे.एम.म्हात्रे,पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रितम म्हात्रे तसेच संपूर्ण म्हात्रे कुटूंबीय आणि जे.एम.म्हात्रे चॕरिटेबल संस्थेचे या "मंदीर पंचायतन"च्या आणि "हिमांशु दिलीप पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल" या आधुनिक शाळेच्या निर्मिती व स्थापनेबद्धल अभिनंदन करून आभार मानले आणि त्यांच्या  या महान कार्याला शुभेच्छा दील्या आहेत.त्यामधील काहींनी 'प्रती शिर्डी' तर काहींनी 'आधुनिक पंढरी' असा या निसर्गरम्य धार्मिक स्थळाचा उल्लेख केला आहे.




Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image