भारताचा ओम वर्मा टेनिस चॕपियन;रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टसचा खेळाडू

भारताचा ओम वर्मा टेनिस चॕपियन;रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टसचा खेळाडू



पनवेल(प्रतिनिधी) श्रीलंकेत संपन्न झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या १४ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ओम वर्मा या खेळाडूने जर्मनीच्या लुईस एलिह नीसे याला पराजित करून विजेतेपद पटकाविले.  
       श्रीलंकेतील कोलंबो झालेल्या एटीएफ १४ अंडर सिरीज या स्पर्धेत श्रीलंका, यूएसए, भारत, कोरिया आणि जर्मनीच्या खेळाडूंनी भाग घेतला होता.  उपांत्यपूर्व फेरीत ओम वर्मा याने श्रीलंकेच्या आहिल मोहमद कलिल याला ६-२ आणि ६-२, तर उपांत्य फेरीत श्रीलंकेच्याच साहा कपिलसेना याला ६-२ व ६-३ या सरळ सेटने पराभव केला. २९ एप्रिलला झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या खेळाडूचाही ६-३, व ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ओम वर्मा ने बाजी मारली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या उलवा नोड येथे असलेल्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लबचा ओम सदस्य असून तो या ठिकाणी टेनिसचा सराव करत आहे. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. 
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image