कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडिया मधील कामगारांना पगारवाढ

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडिया मधील कामगारांना पगारवाढ



उरण(प्रतिनिधी)-कामगार नेते महेंद्र घरत अध्यक्ष असलेल्या न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना सातत्याने न्याय देण्याचे व सन्मानाने जगण्याचे कामहोत आहे. कामगार नेते महेंद्र घरत हे राजकारणाबरोबरच कामगार क्षेत्रातही आपल्या नेतृत्वाने कामगारांना सातत्याने न्याय देत असतात. शेलघर येथील कार्यालयात सवेरा इंडिया प्रा. लि. तळोजा व हिंदुस्तान यार्ड धुतुम या कंपनीतील कामगारांसाठी एकाच दिवशी दोन पगारवाढीचे करार करण्यात आले. सवेरा इंडिया या कंपनीतील कामगारांना तीन वर्षांसाठी ८१०० रुपये पगार वाढ करण्यात आली, तर हिंदुस्तान यार्ड धुतुम मधील कामगारांसाठी ५००० रुपये पगारवाढ करण्यात आली.

        या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील तर सवेरा इंडियाचे ऑपरेशनल मॅनेजर अजय पवार, कामगारांतर्फे संदीप म्हात्रे, हरी पाटील, आत्माराम पाटील, सुभाष तांडेल, विनोद बारशे, रोशन भोईर, भरत बोडके तसेच हिंदुस्तान यार्ड चे डायरेक्टर जितेंद्र सिग, कामगारांतर्फे अरुण पाटील, करण ठाकूर, साईनाथ ठाकूर, किसान ठाकूर, बळीराम फोफेरकर, नारायण ठाकूर, राम ठाकूर, गणेश ठाकूर आदि उपस्थित होते. 

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image