सिडकोतर्फे कांदळवन क्षेत्र हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण;908 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागास करण्यात आले हस्तांतरण
सिडकोतर्फे कांदळवन क्षेत्र हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण;908 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागास करण्यात आले हस्तांतरण

नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोतर्फे दि. 24/05/2022 रोजी एकूण सुमारे 908 हेक्टर कांदनवळाखालील जमीनीच्या हस्तांतरणाबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. यापैकी 279 हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात असून सिडको क्षेत्रातील उर्वरित 629 सिडकोच्या ताब्यात नसलेल्या जमीनीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. श्री. आदित्य ठाकरे, मा. पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दि. 18/04/2022 रोजी झालेल्या बैठकीत सिडकोस कांदळवनाखालील जमीन वन विभागास हस्तांतरित करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते.

या प्रसंगी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. विरेंद्र तिवारी, अति. प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. रवी कुमार, मुख्य नियोजनकार, सिडको आणि श्री. आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते.  

पर्यावरण संरक्षण व  संवर्धन उपक्रम आणि शाश्वत विकासासाठी सिडकोने नेहमीच सहकार्य केले आहे. याचाच एक भाग म्हणून मा. श्री. एकनाथ शिंदे, नगर विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर कांदळवन क्षेत्राचे वन विभागास हस्तातंरण करण्यात आले आहे. 

 सिडको महामंडळाच्या ताब्यात असलेली ठाणे तालुक्यातील सुमारे 1458 हेक्टर कांदळवनाखालील क्षेत्र यापूर्वीच वनविभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहे. मा. पर्यावरण मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, एकूण सुमारे 908 हेक्टर कांदनवळाखालील जमीनीचे हस्तांतरणाबाबतची प्रक्रीया सिडकोतर्फे पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 279 हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात असून उर्वरित सिडकोच्या ताब्यात नसलेल्या जमीनीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत सिडकोने पनवेल आणि उरण तालुक्यांतील कांदळवनाखालील 1258 हेक्टर जमिनीचे हस्तातंरण पूर्ण केले असून नवी मुंबईतील संपूर्ण कांदळवन क्षेत्राचे हस्तातंरण करण्याची प्रक्रिया सिडकोने पूर्ण केली आहे. 


Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image