पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने केला टेम्पोसह 5 लाख 16 हजार रुपये किंमतीचा बेकायदेशीर गुटख्याचा साठा हस्तगत

पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने केला टेम्पोसह 5 लाख 16 हजार रुपये  किंमतीचा बेकायदेशीर गुटख्याचा साठा हस्तगत


पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील सोमटणे रेल्वे फाटकाजवळ एका टेम्पोत बेकायदेशीररित्या साठा केलेला 5 लाख 16 हजार 650 रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेतला आहे.

या संदर्भात खास बातमीदाराकडून वपोनि रवींद्र दौंडकर यांंना माहिती मिळाली की, एका टेम्पोमध्ये बेकायदेशीररित्या दोन इसम आरोग्यास अपायकारक असा प्रतिबंधीत अन्न पदार्थ व मानवी शरिरास घातक लोकजिवीतास धोका निर्माण करणार्‍या प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, सहा.पो.नि.विवेक भोईर, सहा.पो.नि.धनश्री पवार, पो.ना.गणेश सांबरे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन त्या टेम्पोला ताब्यात घेतले आहे व त्यामध्ये 5 लाख 16 हजार 650 रुपयाचा गुटखा हस्तगत केला आहे. व त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 188, 272, 273, 328, 34 सह अन्न सुरक्षा मानदे अधिनियम 2006 मधील कलम 26 (2) (आय), 26 (2) (आयव्ही) व कलम 27 (2) (ई), 59 (2) प्रमाणे  कारवाई केली आहे.

Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image