कोकण किनारपट्टीवरील 31 ऑगस्टपर्यंत वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद

 

कोकण किनारपट्टीवरील 31 ऑगस्टपर्यंत वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद


     *अलिबाग, दि.28 (जिमाका):-* कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग मधील समुद्रकिनाऱ्यांवर दि.26 मे 2022 पासून ते दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच मुरुड येथील जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मेरीटाईम बोर्डाने याबाबत निर्णय घेतला आहे.

     दरम्यान या बंदी कालावधीतही व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स किंवा बोटिंग सुरु ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

     वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग या साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी येतात. 

     दरम्यान हा निर्णय मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील बोट दुर्घटनेमुळे घेतलेला नसून मान्सून काळात दरवर्षीप्रमाणे करावयाची कार्यवाही आहे. पावसाळा तसेच समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी घालण्यात आली आहे.



Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image