श्री सदस्यांकडून 27 गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान

 श्री सदस्यांकडून 27 गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान



नवीन पनवेल : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तसेच पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्वच्छता अभियान कामोठे समिती यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील 27 गावांमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

           १५ मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून ग्रामस्वच्छता अभियानात श्री सदस्यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी ओला व सुका कचरा याचे वर्गिकरण करून कचर्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. नितळसश्री मंगलवाडीब्राम्हण करवलेम्हात्रेपाडाशेलारपाडापोसरीकुंभार्लीचिरडपालीबुर्दुल, विठ्ठलवाडी, नार्हेनऊसाटणेआंबे-चिंचवलीकुत्तरपाडाशिरवलीकानपोलीचींध्रमोहोदरचिंचवलीआंबे म्हाळून्गीनेवाळीकोळवाडीवावंजेखैरणेवलप, पाले बुद्रुक या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा यांच्यातर्फे गेली अनेक वर्ष सातत्याने समाजसेवेचे कार्य सुरू आहे.


--

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image