डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंती महोत्सावानिमित्त कोकण भवनात विविध कार्यक्रमाचे आयोजन-प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांचे मुख्य व्याख्यान

                             

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंती महोत्सावानिमित्त कोकण भवनात विविध कार्यक्रमाचे आयोजन-प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांचे मुख्य व्याख्यान


नवी मुंबई दि.17:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती महोत्सावानिमित्त कोकण भवन इमारतीत प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भिम गीतांचा जल्लोष भिमवंदना कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, कोकण भवन, नवी मुंबई यांच्यावतीने आयोजित केला आहे.

*दि. 19 मे, 2022 रोजी दुपारी 2.00 ते सायंकाळी 7.00 वा.* पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमात कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, माजी प्रशासकीय अधिकारी रमेश थेटे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

        शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती दि.14 एप्रिल 2022 रोजी साजरी करणे शक्य नसल्याने सर्व महापुरुषांची जयंती एकत्रितरित्या दि.19 मे, 2022 रोजी साजरी करण्यात येत आहे. पुराभिलेख संचालनालय, मुंबई या विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रमय प्रदर्शनाचे आयोजनही यावेळी करण्यात येणार आहे. 

          आचार्य श्री नानेश हॉस्पिटल यांच्या सौजन्याने याचदिवशी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण भवन येथील दुसऱ्या मजल्यावरील महिला भोजन कक्ष या ठिकाणी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 यावेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोकण भवन यांनी  केले आहे. 

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image