IPL क्रिकेट सामन्यावर पैश्याचा जुगार चालवणाऱ्या ४ बुकींना अटक

IPL क्रिकेट सामन्यावर पैश्याचा जुगार  चालवणाऱ्या ४ बुकींना अटक

               मा.श्री बिपीन कुमार सिंह पोलीस आयुक्त साो, मा. श्री डाॅ. जय जाधव सह पोलीस आयुक्त सो, श्री महेश घुर्ये मा.अपर पोलीस आयुक्त साो. (गुन्हे) यांनी गंभीर गुन्हे उघडकीस आणणेकामी व गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी दिलेले आदेशाप्रमाणे श्री. सुरेश मेंगडे, मा.DCP साो.गुन्हे व श्री विनायक वत्स, मा. ACP साो. गुन्हे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष - 3  सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2022 या क्रिकेट सामन्यावर पैश्याचा जुगार  संदर्भातील गुन्हयांची माहिती घेत असताना तसेच नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत अश्या प्रकारचा गुन्हयांना प्रतिबंध करण्या करिता गस्ती दरम्यान,दि. 17/04/2022 रोजी व.पो.निरी. शत्रुघ्न माळी गुन्हेशाखा कक्ष 3 यांना गोपनिय बातमीदारांकडून  बातमी वरून क्रिकेटचे बुकी हे बेलापूर येथील  लाॅज वर जुगार खेळणार आहे अशी माहिती मिळाली लागलीच मा DCP सो व मा ACP सो यांना  माहिती दिली त्यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई  करण्याचे आदेश  दिले  परंतु सदरचे क्रिकेटचे बुकी हे APMC नवी मुंबई येथे दाणा बाजार या ठिकाणी असणारे साईदीप दिप लॉजिंग या ठिकाणी गेल्याची माहिती मिळताच  मा वरीष्ठाचे परवानगीने APMC नवी मुंबई येथे दाणा बाजार या ठिकाणी असणारे साईदीप दिप लॉजिंग या ठिकाणी इसमनामे मोहम्मद युसुफ व इमरान हे त्यांचे इतर साथीदारांसह बसून सध्या सुरु असलेल्या आय. पी. एल. 2022 या क्रिकेट स्पर्धेवर पैशांचा जुगार या http://uniquexch.net/admin 

http:// admin.lotusbook999.com

वेसाइटवरून चालवत आहे. सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश मा. अपर पोलीस आयुक्त साो, गुन्हे, मा. पोलीस उप आयुक्त साो, गुन्हे व मा. सहा. पोलीस आयुक्त साो, गुन्हे यांनी दिले.सदर बातमीचा अनुषंगाने छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून घटनास्थळावर उपस्थित इसम यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हाचा अनुषंगाने अटक करण्यात आली असून उपस्तिस्त इसम यांच्या ताब्यातून सुमारे 3,20,600/- एकूण किंमतिचा मुद्देमाल त्यात मोबाईल तंत्र व रोख रक्कम असा जमा करण्यात आलेला आहे.

अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे खालील प्रमाणे....

1) इफ्तेखार अहमद इशराक अहमद खान उर्फ इमरान वय 39 वर्षे व्यवसाय - प्लॅस्टिक स्क्रॅप विक्री, रा. ए 41, जीआरडी फ्लोअर, नाईक नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सायन रेल्वे स्टेशन, सायन ( पश्चिम) मुंबई - 400022, 

2) अलोककुमार शिवकुमार गुप्ता वय 45 वर्षे व्यवसाय  नोकरी ( क्लबमध्ये जॉकी) रा. 53 मुला हलवाई की गली, जैन बस्ती, राजाखेडा, धौलपूर, राजस्थान 328025, 

3) इमरान सलीम शेख वय 25 वर्षे व्यवसाय - केमीकल तयार करणे, रा. बदु्र मंजील, रुम नं. 508, सेक्टर 12 र्इ, खैरणे गाव पाण्याचे टाकी जवळ, कोपरखैरणे, नवी मुंबई, 

4) मोहम्मद युसुफ मोहम्मद युनुस ढड्डा वय 42 वर्षे व्यवसाय - कॅटरर्स, रा. ए 1/32, रुम नं. 11  सी एल जवळ, सेक्टर 21, तुर्भे, नवी मुंबई 400703 व पाहिजे इसम नामे उज्वल आर भानुशाली वय 49 वर्षे (पत्ता माहित नाही) यांनी आपापसात संगणमत करुन लोकांची फसवणूक करण्याचे उद्देशाने व स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता मोबाईल फोन व तंत्राचा वापर करुन क्रिकेट मॅचच्या हारजीतवर मोबाईलद्वारे सट्टा लावताना (बेटींग हा जुगार खेळत व खेळवत असताना) मिळुन आल्याने सरकारतर्फे त्यांचे विरोधात भा.दं.वि. कलम 420, 34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड), महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5, भारतीय टेलीग्राफ ॲक्ट कलम 25(क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

          सदर गुन्ह्यातील आरोपी यांना दिनांक 18/04/2022 रोजी अटक करण्यात आली  असून सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध APMC पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असूनअनेक जणांना या गुन्ह्यात अटक होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे  सदर गुन्ह्याचा तपास  शत्रुघ्न माळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक कक्ष 3, गुन्हे शाखा, नवी मुंबई करत आहे