पनवेलमधून दांपत्य बेपत्ता

 पनवेलमधून दांपत्य बेपत्ता 


पनवेल, दि ०५ (संजय कदम ) : वॉकिंगला जातो असं सांगून राहत्या घरातून घराबाहेर पडलेले नवरा - बायको हे अद्याप घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे 

            विजय सदाशिव दातार (७१ ) व  त्यांची पत्नी ममता (६९) रा . साई अंबे आशिष अपार्टमेंट हे दोघे फेरफटका मारण्यासाठी जातो असं सांगून राहत्या घरातून घराबाहेर पडले होते. विजय दातार यांच्या डोक्याचे केस अर्धवट टक्कल असून केस मध्यम काळे पांढरे , रंग सावळा उंची ५ फूट ४ इंच, अंगाने मध्यम असून अंगात निळ्या व पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला बाह्यांचा शर्ट , गडद निळ्या रंगाची फुल पॅंट व पायात काळ्या रंगाची चप्पल आहे तर ममता यांचे केस लांब काळे - पांढरे , नाक गोल , रंग सावळा , उंची ५ फूट २ इंच , अंगाने मध्यम असून अंगात हिरव्या रंगाचा गाऊन त्यावर लाल रंगाचे पट्टे आहेत, पायात चामड्याची काळ्या रंगाची चप्पल आहे व सोबत मोबाईल फोन आहे . या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे , दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किवा  पोहवा एस. एस . नवले  यांच्याशी संपर्क साधावा.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image