अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 'ते आभाळ भीष्माचं होतं' कादंबरीचा प्रकाशन सोहळा

 अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 'ते आभाळ भीष्माचं होतं' कादंबरीचा प्रकाशन सोहळा


----------------
पनवेल: मानवी संवेदनांचं आत्मभान जपणारी, राजनीती ते राजधर्माचा वास्तूपाठ घालून देणारी आणि जीवनाचा गुंता सोडवून अस्तित्वाचे आभाळ पेलण्याची दिक्षा देणारी ज्येष्ठ नाट्यलेखक, नाट्य व सिनेअभिनेते, कादंबरीकार अशोक समेळ लिखित 'ते आभाळ भीष्माचं होतं' या कादंबरीचा शानदार प्रकाशन सोहळा पनवेलजवळील खांदा कॉलनी शहरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, मंगळवारी ( ता. 3) सकाळी 10.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला आहे.
खांदा कॉलनीतील सेक्टर 7 मधील  डॉ. पिल्लेज ग्लोबल अकादमीच्या पहिल्या मजल्यावरील वातानुकुलित सभागृहात हा शानदार प्रकाशन सोहळा होत आहे. अशोक समेळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभासाठी 'सेलिब्रिटी आपल्या भेटीला' या आयोजकांच्या संकल्पनेनुसार ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक, ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने, ज्येष्ठ अभिनेते संजय मोने उपस्थित राहणार आहेत. यावेळी पहिला मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे यांना आयोजकांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, तहसीलदार विजय तळेकर, गटविकास अधिकारी संजय भोये, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने (पनवेल शहर पोलिस ), सुभाष कोकाटे (खांदेश्वर), रवींद्र दौण्डकर , (पनवेल ग्रामीण), स्मिता जाधव (कामोठे), संजय पाटील (कळंबोली), जितेंद्र सोनावणे (तळोजे), संदीपान शिंदे (खारघर), संजय नाळे (पनवेल वाहतूक शाखा), निशिकांत विश्वकार (कळंबोली वाहतूक शाखा) तसेच पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकीय डॉ. आनंद गोसावी, पनवेल जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सचिन सकपाळ आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
सर्वांसाठी कार्यक्रम खुला आणि विनामूल्य असल्याने चोखंदळ वाचक, रसिक, श्रोते आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
कार्यक्रमानंतर वाचकांसाठी कादंबरी लेखकांच्या सहीनिशी विक्रीसाठी उपलब्ध असेल असे प्रकाशकांच्या वतीने अरुण घाडीगावकर यांनी कळविले आहे. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चहात्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अशोक समेळ यांनीही केले आहे.
Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image