सौ.संगीता बांबोळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

सौ.संगीता बांबोळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


अलिबाग(सचिन पाटील)-रत्नसिंधू साहित्य कलामंच रत्नागिरी च्या वतीने सौ.संगीता बांबोळे यांना रत्नसिंधू नारीशक्ती सन्मान नारीचा या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.पुरस्कार वितरण दिनांक 15 एप्रिल 2022 रोज रविवारला सकाळी 11 वाजता रत्नागिरी येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

      साहित्य चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल सौ.संगीता बांबोळे यांचे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मारूती कांबळे जेष्ठ साहित्यिक,उद्घाटक मा.डॉ. सुरेश कुराडे जेष्ठ साहित्यिक व सामाजिक विचारवंत,प्रमुख व्याख्यात्या मा.प्रा.किर्ती काळमेघ,वनकर प्रसिद्ध साहित्यिका नागपूर,मा.प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे प्रसिद्ध साहित्यिक, डॉ. जनार्दन मोहीते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पुरस्काराबद्दल रत्नसिंधू साहित्य कलामंचचे संस्थापक,मा.सुनिल गोविंद जाधव,संस्थेचे पदाधिकारी मा.जितेंद्र मोहीते,मा. मिलन जाधव,मा.संतोष पवार, मा.मुग्धा कुबडे,मा.अनंत जाधव,मा.पूनम गमरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image