महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडून संतोष शंकर चौधरी (कळंबोली) यांची सेवा सन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडून संतोष शंकर चौधरी (कळंबोली) यांची सेवा सन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड



नवीन पनवेल : संतोष शंकर चौधरी हे शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहन पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली विद्यालयात गेली 21 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक कार्यात,सांस्कृतिक कार्यात समाजसेवा करण्यात त्याच बरोबर परोपरीने आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यात विविध शालेय उपक्रम राबवण्यात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवून महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडून संतोष चौधरी (कळंबोली) यांची सेवा सन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

           संतोष चौधरी याना वेळोवेळी त्यांना शाळेतून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  सतीश पाटीलमुख्याध्यापिका रोहिणी पाटील, संचालक -सनी पाटील व तुषार पाटील यांच्याकडून शाबासकीची थाप मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांना न्यायिक लढा पत्रकार संघ, ठाणे यांच्याकडून शिक्षकरत्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्याकडून वक्ता दशसहस्त्रेषु अशी अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जपणूक करत गरजूंना उदात्त हेतूने मदत केल्याने आपला मानवता धर्म जपणाऱ्या या कार्याची दखल घेऊन कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याकरिता आर एस पी युनिट कल्याण-डोंबिवली तर्फे देवदूत म्हणून ही संतोष चौधरी यांना अरविंद देशमुख (महासमादेशक आरएसपी महाराष्ट्र राज्य) आणि डॉ. पवन अग्रवाल (अध्यक्ष आरएसपी महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीत सन्माचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन 'महाराष्ट्र शिक्षक पॅनलनिवड समितीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कारासाठी संतोष शंकर चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 15 मे रोजी सिनेसृष्टीतील कलावंत शिक्षक आमदार तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृह, पुणे येथे वितरीत करण्यात येणार आहे .आणि तसे एप्रिल रोजी सुरेश भगवान शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देण्यात आले व 15 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल 'अशा गुणवंत कार्यनिष्ठ व कर्तव्यनिष्ठ गुरुजनांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी स्वखर्चाने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करीत आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व शिक्षक व अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image