अनाथ मुलांच्या मदतीसाठी संगीत कार्यक्रम; कार्यक्रमातून अनाथ विद्यार्थ्यांना करण्यात येणार मदत

 अनाथ मुलांच्या मदतीसाठी संगीत कार्यक्रम; कार्यक्रमातून अनाथ विद्यार्थ्यांना करण्यात येणार मदत 



पनवेल(प्रतिनिधी) येथील आपुलकी फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न स्व. लता मंगेशकर, बप्पी लाहिरी, बाल सुब्रहमण्यम यांच्या गाण्यावर आधारित 'ए म्युझिकल ट्रिब्यूट' हा गायन कार्यक्रम  संपन्न झाला.  अनाथ मुलांच्या मदतीसाठी या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी आयोजनाबद्दल आणि अनाथ मुलांना करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल फॉउंडेशनचे कौतुक केले. 
          यावेळी आपुलकी फाउंडेशनचे सल्लागार नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, डॉ. सचिन जाधव, कामगार नेते अनिल जाधव, आपुलकी फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय जाधव, प्रविण मोहोकर, दिनेश भास्कर, मिलिंद उरणकर, रमेश गरुडे, जितेंद्र खैरे, संजय जगताप, सचिन दुन्द्रेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक गोविंद मिश्री, जया पियुष, संदिप शहा, शाकंबरी बागडे, डी. महेश यांनी गायनाने उपस्थितांची मने जिंकली. या संगीत कार्यक्रमाला अरुण कारेकर यांचे संगीत संयोजन लाभले. या कार्यक्रमातून जमा झालेल्या रक्कमेतून बालग्राम अनाथ आश्रमाला मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे प्रविण मोहोकर यांनी दिली. 
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image