तपस्वी नंदकुमार गोंधळी यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हिरकणी पुरस्कार जाहीर.....

तपस्वी नंदकुमार गोंधळी यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हिरकणी पुरस्कार जाहीर.....


दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी जालना येथे होणार सन्मान...

महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि महिलांनी महिलांसाठी सुरू केलेले एकमेव मराठी साप्ताहिक वृत्तपत्र अष्टभुजा हिरकणी आणि उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी जालना येथे हिरकणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यावेळी कर्तबगार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील दहा महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारा करिता आपल्या रायगड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कायम हिरीरीने सहभागी होणाऱ्या प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा  राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार तपस्वी गोंधळी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. याकरिता तपस्वी गोंधळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image