डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत पोलीस पाटलांना अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले मार्गदर्शन
अलिबाग,दि.11(जिमाका):- रायगड जिल्हा पोलीस व स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत "पोलीस पाटील यांचे हक्क व कर्तव्य" या विषयावर झूम मीटिंग च्या माध्यमातून अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले.
यावेळी स्वदेस फाउंडेशन चे उपसंचालक तुषार इनामदार सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
पोलीस पाटलांचा "क्षमता बांधणी" हा कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार असून त्यामध्ये शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध विषयावर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला पोलीस पाटलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.