महालक्ष्मी हौसिंग सोसायटी घरकुल,सेक्टर-१५,खारघर ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली

महालक्ष्मी हौसिंग सोसायटी घरकुल,सेक्टर-१५,खारघर ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली



खारघर (प्रतिनिधी)-महालक्ष्मी को.आॕप.हौसिंग सोसायटी,घरकुल,सेक्टर-१५,खारघर,  इमारत क्रमांक १ ते २४ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अॕडव्होकेट स्नेहल सुरेश खेडकर यांनी आज संपन्न झालेल्या सभेत जाहीर केले.तसेच निवडून आलेल्या सदस्यांच्या नावांचे वाचन केले.                                    

        सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांमधून सोसायटीचे संस्थापक शिवराम परब,मावळते अध्यक्ष प्रविण कदम,श्रीमती कौसल्या साळवे आणि संजय महाडिक यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.कार्यकारीणी निवडण्याचा कार्यक्रम सिडकोचे जाॕईंड रजिस्ट्रार येत्या १५ दीवसांत जाहीर करतील असे    निवडणूक निर्णय अधिकारी अॕडव्होकेट स्नेहल सुरेश खेडकर यांनी जनसभाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.                                                        

       सभेच्या शेवटी प्रकाश पांढरे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे,बिनविरोध निवडून आलेल्या १७ सदस्यांचे आणि निवडणूक निर्णय आधिकारी अॕड.स्नेहल खेडकर यांचे आभार माणून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.



Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image