सीकेटी महाविद्यालयाचा (स्वायत्त )पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

सीकेटी महाविद्यालयाचा (स्वायत्त )पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न 

 


पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्कॉमर्स अँड सायन् कॉलेज (स्वायत्त) मधील पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा मंगळवारी (दिनांक २६ एप्रिल) समारंभपूर्वक पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे  कुलसचिव  डॉ. प्रफुल्ल अ. पवार उपस्थित  होते.

     या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, रामशेठ ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. सी. मराठे आणि संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभलीया प्रसंगी प्रभारी प्राचार्य मा. प्रो. डॉ. एस. के. पाटील आणि  आर्टस्कॉमर्स  अँड सायन् विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध  विभागांचे प्रमुख मंचावर मान्यवरांसोबत उपस्थित होते.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव  डॉ. प्रफुल्ल पवार यांनी, विद्यार्थ्यांचे कोविड-१९ च्या कारकिर्दीतही उल्लेखनिय यश संपादन केल्याबद्दल कौतुक केले. हा दिवस शिक्षक आणि पालक यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केले. या संस्थेने विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी देखील मार्गदर्शन दिले असे संस्थेचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन असे सांगितले की, तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठे स्वप्न उराशी बाळगा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा.

  लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे सुद्धा कौतुक केले. त्यांनी असेही संबोधित केले की, नुसते पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसून या जगात वावरण्यासाठी सामान्य ज्ञानही महत्वाचे आहे, असा मौलिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

        या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र तसेच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ , सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या शानदार समारंभामध्ये एनसीसीच्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या सोहळ्याची सुरवात सुरेल स्वागत गीताने झाली. त्यानंतर  प्राचार्य मा. प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यांनी आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला.

     या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगु काना ठाकूर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रोडॉएसकेपाटील यांनी कौतुक केलेतसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. एम. ए. म्हात्रे, परीक्षा नियंत्रक डॉएसआय. उन्हाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक डॉएसआय. उन्हाळे यांनी केले.  प्रा. डॉ. आर. व्ही. येवलेप्रा. डॉ. जिएस. तन्वर यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले.