केंद्र सरकारचा उच्च व तंत्रशिक्षणावर भर-एनएमआयएमएसच्या दीक्षांत समारंभ केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारचा उच्च व तंत्रशिक्षणावर भर-एनएमआयएमएसच्या दीक्षांत समारंभ केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन 



नवी मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी)  : केंद्र सरकारने तांत्रिक शिक्षणावर भर दिला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी भारत सरकारने प्राथमिक शिक्षणात कोडींग आणले असून उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयात जागा वाढविल्या आहेत. सर्वांना आंतरराष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगला रोजगार मिळाला आहे. तुमच्या आयुष्यातील हनेक चांगला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा तयार आहे. तुम्ही सर्वजण खऱ्या आयुष्यात लवचिक जीवनाचे साक्षीदार आहात असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते एनएमआयएमएस नवी मुंबई कॅम्पसचा दीक्षांत सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी विद्यापीठाचे सीईओ मॅकनली सयाजी, असीम श्रीवास्तव, प्राध्यापक सदस्य, बोर्डचे सदस्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह,  कुलपती कर्ता श्री भरत संघवी आणि डॉ. शरद म्हैसकर यांची उपस्थिती आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी आठवले यांच्या हस्ते दीक्षांत सोहळ्यात पदवीदान करण्यात आले. कोरोना नंतर तब्बल दोन वर्षानंतर विद्यार्थी एका भव्य सोहळ्यात एकत्र आले होते. यावेळी विद्यार्थी,  शिक्षक, आणि पालकांचा आनंद ओसंडून वाहत होता. 


Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image