पनवेल येथील सार्वजनिक सुलभ शौचालय तोडले

 पनवेल येथील सार्वजनिक सुलभ शौचालय तोडले



 पनवेल : पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील सार्वजनिक सुलभ शौचालय पनवेल पालिकेच्या वतीने तोडण्यात आले. मात्र हे सुलभ शौचालय तोडण्याची एवढी घाई का करण्यात आली असा सवाल विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी विचारला आहे.
      यापूर्वीदेखील सभागृहात विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आणि नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुलभ शौचालय तोडू नये यासाठी आवाज उठवला होता. तसेच नागरिकांनी देखील हे सुलभ शौचालय चालू ठेवण्यासाठी सांगितले होते. मात्र पालिकेने आर्थिक देवाण-घेवाण मधून शौचालय तोडण्याचा घाट  घातला. 30 मार्च रोजी पनवेल मध्ये विरोधी पक्षनेते नसताना पालिकेने हे शौचालय तोडले. शहराच्या मध्यभागी असणारे हे शौचालय नागरिकांच्या उपयोगी पडत असे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी हे शौचालय पडले असल्याचा आरोप केला जात आहे.

             1998 मध्ये पनवेल नगरपालिका मार्फत या स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. पनवेल मध्ये सामान खरेदी करण्यासाठी व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना हे सुलभ  शौचालय सोयीचे ठरत होते. मात्र गेल्या २३ वर्षांपासून नागरिकांच्या सोयीचे ठरत असलेले शौचालय  पालिकेने तोडले.
Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image